| होळी |
होळी हा
रंगांचा सण आहे. या
दिवशी सर्व लोक
आपले जुने राग
रोष विसरून एकमेकांना
रंग, गुलाल लावतात. लहान
मुले आणि तरुणांमध्ये
या दिवसाची जास्त
उस्तुकता असते.
फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला
हा सण साजरा केला जातो.
ह्या सणाविषयी अनेक
कथा जोडलेल्या आहेत.
होळीच्या दिवशी रात्री होळी
जाळली जाते या
मागे एक आख्यायिका
आहे.
राजा हिरण्यकश्यप
हा स्वतःला देव
समजत असे, पण
त्याचा मुलगा प्रल्हाद हा
विष्णू भक्त होता. राजाने
भक्त प्रल्हाद ला
विश्णु भक्ती
करण्यापासून थांबवण्याचा प्रयन्त केला
, पण प्रळाडणे नकार
दिल्यानंतर राजाने त्याला मारण्याचा
प्रयत्न केला.
शेवटी राजाने प्रल्हादला
मारण्यासाठी बहिण होळीका
ची मदत घेतली.
होळीकाला अग्नीत
न जळण्याचे वरदान
प्राप्त होते. राजाच्या सांगण्यावरून
प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवून
अग्नीत प्रवेश केला. परंतु
विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद
वाचले आणि होळीका
भस्म झाली.
या कथेमधून
हा संकेत मिळतो
कि वाईटावर चांगल्याच
विजय होतोच. आजतागायत
फाल्गुन पौर्णिमेला होळी जाळली
जाते आणि दुसऱ्या
दिवशी रंगपंचमी
साजरी केली जाते.
हा एक रंगाचा
सण आहे.
या सणाची
लहान मुलेआतुरतेने
वाट पहात असतात.
या सणामुळे घरात
अतिशय आनंदाचे वातावरण
असते.